(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील केतकी भागणेवाडी येथील पाकाडीजवळ एसटी स्टॉपच्या बाजूला असलेल्या सौरउर्जेच्या बॅटर्या चोरणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर पांडुरंग सावंत (52, काविळतळी, चिपळूण), सलीम युसुफ शहा (52, काविळतळी, चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद रिया राजेंद्र गोंधळी (42, केतकी, साळीवाडा, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत वरील दोघांनी 24 हजार 599 रुपयांच्या 3 सोलार बॅटर्या चोरल्या. पोलिसांनी दोघांवर भादविकलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.