(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण शहरातील गांधी चौक येथील रुममध्ये ठेवलेला 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी एका चोरटयाला अटक करण्यात आली आहे. शंकर मंडल (पूर्ण नाव माहित नाही, सध्या, गांधीचौक, चिपळूण, मूळ आसाम) असे अटक करण्यात आलेल्या चोरटयाचे नाव आहे. याबाबतची तक्रार अजायकांत विरेंद्रसिंह चुल्हावली (18, उत्तरपदेश, चिपळूण) याने चिपळूण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुल्हावली याने आपल्या घरातील रुममध्ये विवो टी-1, 5 जी कंपनीचा मोबाईल ठेवला होता. 7 डिसेंबर रोजी रुममध्ये कोणी नसल्याची संधी साधत संशयित आरोपी शंकर मंडल याने चोरी केली. पोलिसांनी शंकर मंडल याच्यावर भादवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.