( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळूण तालुक्यातील पेढे कोष्टेवाडी येथे घरफोडीत चोरटयांनी 50 हजार रुपयांची रोख रक्कम लांबवल्याची घटना 31 डिसेंबर रोजी घडली. याबाबतची फिर्याद पृथ्वीराज सोळंकी (34, पेढे, कोष्टेवाडी, मूळ राजस्थान) यांनी 8 जानेवारी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज सोळंकी हे पेढे कोष्टेवाडी येथील सुधीर पाटील यांच्या घरी भाड्याने राहतात. ते बाहेर गावी गेलेले असताना अज्ञाताने पुढील दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. यावेळी त्याने घरातील देवरुममध्ये लोखंडी कपाटात लॉकरमध्ये ठेवलेले 50 हजार हजार रुपये लंपास केले. याबाबतची फिर्याद पृथ्वीराज सोळंकी यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर भादविकलम 380, 454 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे