(चिपळूण)
केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चार स्थानांवर मुलीनी बाजी मारली आहे. मुळची चिपळूण ची असलेली व सध्या मुंबईत वास्तव्याला असलेली प्रियंवदा म्हाडदळकरने गुणवत्ता यादीत 13 वी रँक मिळवली आहे.
व्हीजेटीआय कॉलेजमधून प्रियंवदाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेत एमबीएचा शिक्षण पूर्ण केला. खासगी क्षेत्रात नोकरी करत असताना चांगल्या संधी मिळत होत्या. मात्र असे असताना सुद्धा प्रियंवदाने प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले व त्यासाठी मागील दोन वर्षापासून परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.