(चिपळूण)
मोबाईलवर आलेली लिंक ओपन करुन त्यावर माहिती भरल्यानंतर ओटीपीची माहिती दिली असता यातूनच बँक खातेदाराची 99 हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना सावर्डे परिसरात घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे.
एका एसबीआय बँकाच्या ग्राहकाचा त्याच्या बँक खात्यास मोबाईल लिंक आहे. त्यावर इलेक्ट्रीसिटी बिल अपडेट करण्यासाठी अज्ञाताने लिंक पाठवली. ही लिंक ओपन करुन त्यावर बँक खातेदाराने माहिती भरल्यानंतर आलेला ओ.टी.पी. नंबर त्याने अज्ञाताला सांगितला. यातूनच त्या बँक खातेदाराच्या खात्यातून एकदा 50 हजार व दुसऱ्यावेळी 49 हजार रूपये असे एकूण 99 हजार रुपये यूपीआयव्दारे ट्रान्स्फर करुन बँक खात्यातून ऑनलाईन काढल्याची घटना घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे.