(चिपळूण)
रस्त्याच्या असणाऱ्या मधोमध अंडरग्राऊंड गटार लाईनवर पडलेल्या मोठ्या खड्डयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी शहर अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा करून अनोख्या पध्दतीने दसरा सण साजरा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधत या गटार लाईनचे काम निकृष्ट झाल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी समोर आणले. या अनोख्या आंदोलनाचे सर्वांनी कौतुक केले.
बहादूरशेख नाका मच्छिमार्केट शेजारी गुहागर-विजापूर हायवे लगत स्वातंत्र्यवीर सावरकर लघु औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या गटार लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या गटार लाईनवर भला मोठा खड्डा पडला आहे. बहादूरशेख नाक्यावरून होणारी वाहतूक याच रस्त्यावरून वळविल्याने येथील खड्ड्यात वाहने अडकून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी शहर अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत खड्डयाची पूजा करून अनोख्या पध्दतीने दसरा सण साजरा केला.
यावेळी चिपळूण उपशहर अध्यक्ष गुरु पाटील, उपशहर अध्यक्ष संदेश सुरुसे, उपशहर अध्यक्ष राजेंद्र गोंजारे, विभाग अध्यक्ष विनोद चिपळूणकर, विभाग अध्यक्ष निलेश जामसूतकर, वार्ड अध्यक्ष ओंकार पिलवलकर, वार्ड अध्यक्ष पंकज कुंभार, अमित सावर्डेकर, वेदांत चिपळूण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.