(चिपळूण)
गाडी पंक्चर केली, असा समज करून घेत शिवीगाळ करत एकाने तरुणावर सुऱ्याने हल्ला केला. हा प्रकार रविवारी शहरातील बहादूरशेख नाका येथे घडला. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या प्रौढावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुझफ्फर मुजीबर रहेमान पठाण (५६, बहादूरशेख नाका) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याची फिर्याद राकेश रमेश चव्हाण (३७, दळवटणे) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश चव्हाण हे गणी प्लाझा बिल्डिंगमधील स्वतःच्या सलूनच्या दुकानात काम करत होते. मुझफ्फर पठाण हा चव्हाण यांना माझी गाडी तुम्हीच पंक्चर केली, असे बोलून शिवीगाळ करू लागला. त्याने त्याच्या गाडीच्या डीक्कीतील मासे कापण्याच्या सुऱ्याने चव्हाण याच्या डाव्या कानाच्या मागील बाजूस वार केला. यात त्यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी मुझफ्फर पठाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला