चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेने उभ्या केलेल्या उद्यानांची दुरावस्था झाली आहे. उद्यानांच्या देखभालीकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले असून, या उद्यानाकडे महिनो-महिने कंत्राटी कामगार फिरकलेच नसल्याचे समजते.
चिपळूण नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करून उद्याने उभी केली आहेत. मात्र, या उद्यानांची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सानेगुरुजी उद्यानाचे सुशोभीकरण करून गेल्या महिनाभरापूर्वी लोकार्पण सोहळा देखील झाला आहे. मात्र, उद्घाटन खर्चावरून देखील सानेगुरुजी उद्यानाचा लोकार्पण सोहळा गाजत आहे. तर दुसरीकडे उर्वरित उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
खर तर पावसाळ्यात उद्याने बंद असतात. प्रत्येक उद्यानाला १ याप्रमाणे ६ कंत्राटी आहेत. तरी पाग येथील उद्यान वगळता इतर कुठल्याही उद्यानात कामगार बऱ्याच महिन्यात कामगार फिरकले नसल्याचे तेथील परिस्थीती पाहताआणि आजुबाजूच्या लोकांकडून माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे नगर परिषदेचे ६ कामगार फक्त कागदावरच आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे.