(श्रीहरीकोटा)
चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आणि चांद्रयान-३ विक्रम लँडर यांच्यात संपर्क झाल्याची माहिती इस्रोने दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने सोमवारी सांगितले की, चांद्रयान-२ ऑर्बिटर आणि चांद्रयान-३ लँडर मॉड्यूल विक्रम यांच्यात यशस्वी द्विमार्गी संपर्क झाला आहे. चांद्रयान-३ आधीचे इस्त्रोचे मिशन चांद्रयान-२ चे ऑर्बिटर अद्यापही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला. वेलकम बडी म्हणत इस्त्रोने पोस्ट शेअर केली आहे
सन २०१९ मध्ये इस्रोच्या चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून सीएच-२ चे ऑर्बिटरने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आता चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरचे स्वागत केले आहे. चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३ च्या लँडरसोबत संपर्क करत संदेश पाठवला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे. इस्रोने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. इस्रोने सांगितले की, चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर मॉड्यूलचे स्वागत केले आहे. या दोन्हींमध्ये दुतर्फा संवाद प्रस्थापित झाला आहे. आता बेंगळुरूमध्ये स्थित मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स मध्ये विक्रम लँडर मॉड्यूलसोबत संपर्क साधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
Chandrayaan-3 Mission:
‘Welcome, buddy!’
Ch-2 orbiter formally welcomed Ch-3 LM.Two-way communication between the two is established.
MOX has now more routes to reach the LM.
Update: Live telecast of Landing event begins at 17:20 Hrs. IST.#Chandrayaan_3 #Ch3
— ISRO (@isro) August 21, 2023
चांद्रयान ४० दिवसानंतर चंद्रावर उतरणार
चांद्रयान-३ हे अंतराळयान १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता बाहुबली रॉकेट एलव्हीएम-३ यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान-३ मोहिमेतील आतापर्यंतचे सर्व टप्पे ठरल्याप्रमाणे पार पडले आहेत. त्यामुळे सर्व काही नियोजित केल्याप्रमाणे पार पडले तर, चांद्रयान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.
चांद्रयान 3 कडून आलेले नवे फोटो इस्रोने जारी केलेत. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्याआधी हे फोटो आलेत. विक्रम लँडरवर इस्रोने एक विशेष कॅमेरा बसवलाय. लँडर उतरण्यासाठी योग्य जागा शोधण्याचं काम हा कॅमेरा करतोय. चंद्राच्या पृष्ठभागावरील भली मोठी विवरं, मोठमोठाले खडक हे या कॅमेऱ्यातून दिसत आहेत. अशा चार भल्ल्यामोठ्या विवरांना इस्रोने नावंही दिली आहेत. या नावांसहीत हे फोटो इस्रोने जारी केलेत. विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरेल. हे लँडिंग यशस्वी झालं तर अमेरिका, रशिया आणि चीनपाठोपाठ चंद्रावर लँडर उतरवणारा भारत चौथा देश ठरणार आहे.
ISRO ने चांद्रयान-3 बाबत आणखी एक अपडेट दिले आहे. चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याची तारीख 27 ऑगस्टपर्यंत देखील पुढे ढकलली जाऊ शकते. अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितलं की, चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या 2 तास आधी आम्ही लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ. यानंतर आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याबाबतचा निर्णय घेऊ. जर आम्हाला वाटत असेल की लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही तर आम्ही लँडिंगची तारीख 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. मात्र आमचा पहिला प्रयत्न 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडर उतरवण्याचा असेल, असे ते म्हणाले.