(मुंबई)
घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांना आणखी मोठा झटका बसणार आहे. आजपासून देशांतर्गत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
केंद्राच्या या निर्णयानंतर राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. ५ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात १८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८.५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे..