( खेड )
खेड मधील सुसेरी नंबर 1 साठेवाडी येथे बिगर परवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश अरुण माने (29, रा. सुसेरी, साठेवाडी, खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे सुमारे 420 रुपये किमतीची 7 लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. ही घटना 12 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा सदाशिव बांगर यांनी येथील पोलिस स्थानकात दिली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवी करत आहेत.