(खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील भरणेनाका येथील काळकाई मंदिराच्या परिसरातील जोगवा मागणारी महिला आपल्या दोन मुलांसह पतीसोबत झोपलेली असताना एका अज्ञाताने महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड करून पतीला झोपेतून उठवले असता अज्ञाताने त्यालाही विरोध केला. याचा राग मनात धरून अज्ञाताने आपल्या जवळील लाकडाच्या दणक्याने डोक्यात वार करून पती सुरेश काळे याला गंभीर दुखापत केली. त्यांना कळबणी बुद्रूक उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री 02 वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी महिलेने येथील पोलीसात फिर्याद दाखल केली. ही महिला कर्नाटकातील असल्याची माहिती मिळत आहे.