(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील बहिरवली नं.१ या गावातील सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच नूर हमजा चौगुले यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. नूर हमजा चौगुले हे सामाजिक कार्यकर्ते असून आपल्या अनुभवाच्या बळावर अनेक गोरगरिबांसाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत.
आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गोरगरिबाना न्याय मिळवून दिला आहे. तसेच संजय गांधी निर्धार योजनेचा लाभ अनेक महिलांना उपलब्ध करून दिला आहे. त्यांचा मनमिळावू व शांत स्वभाव हा गावामध्ये लोकप्रिय आहे. श्री नूर हमजा चौगुले यांनी सांगितले की, आपण सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्वांना न्याय देऊन समाज जागृतीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.