( खेड )
तालुक्यातील आवाशीफाटा येथे गोरे चाळीतील घरातून दोन मोबाईल चोरीस गेल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद आकाश कोदई यादव (22, लेबर कॉन्ट्रक्टर सुपरवायझर, सध्या आवाशी, खेड, मूळ बदलापूर) याने खेड पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश यादव याने आपल्या घरी ओप्पो ए-96 कंपनीचा 20 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल आणि सॅमसंग कंपनी 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल घरी ठेवला होता. मात्र यादव घराच्या लॉकची चावी 11 फेब्रुवारी रोजी हरवली होती. याच हरवलेल्या लॉकच्या चावीने अज्ञाताने घरातील 20 हजार 500 रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरले. यादव याने खेड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीस गेल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 380, 454 नुसार गुन्हा दाखल केला आहे.