(खेड)
खेड तालुक्यातील किंजळे तर्फे कांदोशी विकास संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये शिवसेनेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदी शिवसेना महिला आघाडीच्या रेखा ऊर्फ श्रुतिका गजानन चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी अनंत सोनू कांबळे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे आस्तान जिल्हा परिषद गटाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
या विकास संस्थेच्या निवड प्रक्रियेत संघटक महेश मोरे व सहाकाऱ्यानी विशेष लक्ष देवून विकास संस्था शिवसेनेच्या अधिपत्याखाली राहील याची दक्षता घेतली. त्यांना वडगाव, वडगांव खुर्द , कळबणी खुर्द , बिरमणी, कांदोशी किंजळे तर्फे खेड येथील शाखा प्रमुख व सहकार प्रेमीनी सहकार्य केले.
खेड तालुक्यात आमदार शिवसेनेचा, सभापती, शिवसेनेचा सरपंच शिवसेनेचा मग विकास संस्थेचा चेअरमन शिवसेनेचा का नाही? याबाबत खेड शिवसेनेने केलेल्या जनजागृतीला यश आले. या संस्थाच्या निवडणुकामध्ये शिवसैनिकानी लक्ष घातले व जास्तीत जास्त विकास संस्थावर शिवसेनेचे पॅनल आणण्याचा प्रयत्न केला त्याला काही अपवाद वगळता चांगले यश आले. खेड तालुक्यात सहकार विभागवार वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसैनिक अग्रेसर असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे . या सर्व यशस्वी पदाधिकात्यांचे आमदार योगेश कदम यांनी अभिनंदन केले.