खेड तालुक्यातील बोरज येथे घोसाळकर कुटुंबात तौक्ते चक्रीवादळामुळे वीज वाहिनीचा धक्का बसून पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तौक्ते चक्रिवादळ नुकसानग्रस्त कोकण भागाच्या पाहणी दौ-या दरम्यान मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई, सरचिटणीस व खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर यांनी बोरज येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन घोसाळकर कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले.
घरातील पितृ व मातृछत्र एकाच वेळी हरपणे ही बाब अतिशय क्लेशदायक आहे. या कुटुंबियांना कितीही शब्द दिले तरी सांत्वन होऊ शकत नाही. गेलेले जीव काही परत येत नाहीत. पण कुटुंबाला लागणारे जे बळ आहे, ते देण्याचा प्रयत्न आपण करू असे त्यांनी आश्वासन दिले.