(रत्नागिरी)
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ठेव वृद्धी मास दि. १५ जून, २०२२ ते १५ जुलै, २०२२ या कालावधीत संपन्न होत आहे. १ वर्षांकरिता ९% व्याज दर व ३ वर्षे १ महिन्याकरिता ९.२५% व्याज दर या कालावधीत ठेवींवर देण्याचे पतसंस्थेने निश्चित केले आहे.
पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्याच्या कार्यकाळात १८लाख २९ हजाराचा नफा प्राप्त करत ‘अ’ वर्ग प्राप्त केला व एप्रिल २०२२ ते मे २०२२ या चालू आर्थिक वर्षातील २ महिन्यात ९ लाख ९७ हजार नफा प्राप्त करत जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची ही वाटचाल खऱ्या अर्थाने विश्वासहार्य होताना दिसत आहे.
संस्थेची ३१ मे २०२२ अखेर ३९९५ सभासद संख्या , ०६ कोटीच्या ठेवी, ०४ कोटी ४८ लाखांची कर्जे, ०२कोटी ४६ लाखाची गुंतवणूक, ७ कोटी १६ लाखांचे खेळते भांडवल, १ कोटी १२ लाख स्वनिधी, ६०.०५% सी. डी.रेशो,९५.०२% वसुली. ही सर्व आर्थिक स्थिती प्रमाणबद्ध आहे.
जिल्हास्तरावरचे कार्यक्षेत्र असतानाही १ शाखा व १ सेवाकेंद्राच्या आधारावर सलग ४ वर्षे ‘अ’ वर्ग प्राप्त, आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था, पहिल्या वर्षापासूनच सभासदांना शेअर्स च्या रकमेवर लाभांश देणारी पतसंस्था, ४२ महिन्यात सोने तारण कर्ज मुदतीत कर्ज खाते बंद करून एकही कर्ज खात्याचा लिलाव न करण्यास पात्र ठरलेली पतसंस्था, संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणिकृत असणारी पतसंस्था, सभासदांचे मनोबल उंचावून सभासदांमध्ये खऱ्या अर्थाने सहकार रुजवणारी पतसंस्था तर अल्पावधीतच शाखाविस्तारांचा प्रस्ताव सादर करणारी पतसंस्था ठरली आहे.
ग्राहकांना नियोजनबद्ध ,नम्र व जलद सेवा देत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केलेले आहे. अल्पावधीतच संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम झालेला आहे. संस्था आपल्या आर्थिक सक्षमतेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत तसेच सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक स्पर्धेच्या या युगात अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने पेलले आहे. आर्थिक शिस्त,विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत “खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने” आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णू केला आहे.
संस्थेच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे १३ जणांचे संचालक मंडळ ५ जणांचा कर्मचारी वर्ग, १३ जणांचे जिल्हा समन्वय समिती मंडळ व नवनियुक्त १तज्ञ संचालक यांचे मार्फत संस्थेचे गतिमान झालेले मार्गक्रमण संपूर्ण जिल्ह्याला गवसणी घालत आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून विस्तारत आहे. सहकारातील सामुहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञान, व्यवसाय संधी याचा कायद्याच्या परिघात राहत अचूक लाभ उठवत ग्राहकांनाही या लाभात सहभागी करून घेण्यात खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था अव्वल ठरली आहे.
ठेव वृद्धी मासमध्ये विविध प्रकारच्या ठेवी ठेवण्याकरीता संचालक मंडळ सर्वांना आवाहन करत आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, सहकार्य अविरत बहरत राहो, हा अर्थविस्तार अखंड अग्रेसर होत राहो, अशी प्रार्थना संचालक मंडळाने ईश्चवर चरणी केली आहे.