(मुंबई)
भारतीय क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे. कारण आता महेंद्रसिंह धोनी प्रॉडक्शन हाऊसकडून एलजीएम या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आल्यामुळं आता महेंद्रसिंह धोनी प्रॉक्शशन हाऊसकडून बॉलिवूड चित्रपटांचीही निर्मिती केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
एलजीएम-लेट्स गेट मॅरिड असं धोनी प्रोडक्शन हाऊसने रिलीज केलेल्या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. महेंद्रसिंह धोनी प्रॉडक्शन हाऊसच्या एलजीएम-लेट्स गेट मॅरिड या चित्रपटात हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय थमिलमणी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. महेंद्र सिंह धोनी प्रॉडक्शन हाऊसकडून पहिल्या चित्रपटाची निर्मिती ही कमीत कमी बजेटमध्ये केली जाणार असून हा कॉमेडी ड्रामा चित्रपट असणार आहे.
First look of #LGM is here!
Get ready to be bowled over by this fun filled family entertainer! pic.twitter.com/JtCRXZvh45— Dhoni Entertainment Pvt Ltd (@DhoniLtd) April 10, 2023