आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. आरोग्य यंत्रणेवर तर भयंकर ताण पडला आहे. आरोग्य यंत्रणेला अनेक कोरोना प्रतिबंध साहित्य, तसेच औषध साठा याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णाचे हाल होत असल्याने कोरोना संकट काळात सामाजिक बांधीलकीतून विस्टीऑन टेक्नीकल आणि सर्विसेस सेंटर प्रा.लि पिंपरी चिंचवड पुणे या कंपनीने आणि रिअल लाईफ रिअल पिपल – पुणे यांच्या सहकार्यातून, तसेच श्री राजीव शिंदे यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिपळूण यांच्या सहकार्याने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती चिपळूण, अलोरे – शिरगाव पोलीस स्टेशन, निर्मल ग्रामपंचायत कोळकेवाडी , कोरोना योद्धा केंद्र कोळकेवाडी यांना कोरोना प्रतिबंध साहित्य आणि औषध साठा याची भरीव मदत करण्यात आली आहे.
आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंध साहित्य व औषध साठा तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती चिपळूण डॉक्टर ज्योती यादव, अलोरे – शिरगाव पोलीस स्टेशन कोरोना प्रतिबंध साहित्य ए.पी.आय. संदीप पाटील, निर्मल ग्रामपंचायत कोळकेवाडी यांचे कोरोना प्रतिबंध साहित्य कोळकेवाडी गावच्या सरपंच सौ.पल्लवी शिंदे आणि कोरोना योद्धा कोळकेवाडी केंद्राचे कोरोना प्रतिबंध साहित्य कोळकेवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ शैलजा लांडे इत्यादी जबाबदार व्यक्तींकडे त्यांच्या मुख्यालयी सुपूर्द करण्यात आले आहे.
त्यामध्ये विस्टीऑन कंपनीने दिलेले पीपीई किट्स, ऑक्सिमिटर , थर्मल गण, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, बॉडी पकिंग किट्स, मास्क आणि कोरोना प्रतिबंध औषधे यांचा समावेश आहे.यावेळी प्रांताधिकारी श्री प्रविण पवार, तहसीलदार श्री जयराज सूर्यवंशी, पंचायत समिती चिपळूण सभापती श्रीम.रिया कांबळे, माजी बांधकाम सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री विनोद झगडे, श्री गटविकास अधिकारी श्री प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी श्री डी.डी.ईरनाक, संघटनेचे सेवानिवृत्त नेते श्री विलास गुजर, ए.पी.आय.श्री संदीप पाटील, कोळकेवाडी गावच्या सरपंच सौ.पल्लवी शिंदे.कोळकेवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ शैलजा लांडे, शिरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रामभाऊ लांडे, जिल्हा सरचिटणीस श्री दीपक मोने, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिपळूणचे सर्वेसर्वा अध्यक्ष श्री प्रकाश गांधी इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते .
डॉ.ज्योती यादव, ए.पी.आय.श्री संदीप पाटील, कोळकेवाडी गावच्या सरपंच सौ.पल्लवी शिंदे आणि कोळकेवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ शैलजा लांडे या सर्वांनीच मनोगत व्यक्त करताना विस्टीऑन कंपनीकडून सदरील साहित्य दिल्याबद्दल विस्टीऑन कंपनीचे अध्यक्ष मा.श्री.आशिष भाटीया आणि सहाय्यक मॅनेजर मा.श्री सिद्धार्थ बंगार याचे कोरोना संकटात मदतीचा हात दिल्याने खूप खूप आभार मानले आणि खूप खूप धन्यवाद दिले. रिअल लाईफ रिअल पिपल यांचेही मोलाच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आणि असेच सहकार्य लाभावे असे नमूद केले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव श्री दीपक मोने , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिपळूणचे अध्यक्ष श्री प्रकाश गांधी, सचिव -विनायक गुरव, फिरोज खान, तुकाराम धापसे, बळीराम पानिंद्रे , कृष्णदास डिके, कृष्णाजी कोकमकर, राम रहाटे, संभाजी चव्हाण, सुनील उबळेकर, देवराव शिसोदे, युगेश कदम, विजय शिंदे, दीपक खाडे, दीपक कांबळे, प्रविण सन्मुख, गौतम जाधव, रामा भवार, बाबासाहेब धायतडक, विश्वास पाटगावकर, किरण गोखले, दिनेश लांजेकर, अशोक गोरीवले इत्यादी शिक्षक योदयाचे सहकार्य लाभले .