(ठाणे)
गुलामी छळाच्या जाचेतून, येणाऱ्या लोकशाही माणुसकीत ताठ मानेने जगण्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची अहूती देत १५ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणजेच आजच्या सुमारे ७६ वर्षापूर्वी माणसातल्या माणुसकीला स्वतंत्र्य मिळून दिले. या ७६ वर्षात लोकशाही कृषिप्रधान भारत देशाने प्रचंड प्रमाणात प्रगती केली. त्या वेळच्या घडामोडीच्या परंपरा काही अंशी भारत देशाने साथ करीत अधिकाधिक यशाची शिखरे गाठली. जसे शरीरातील रक्तवाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत जात शरीराला जगण्यासाठी चालना देतात; त्याचप्रमाणे भारतातील रेल्वे हा दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा भारतीय रेल्वे मार्ग कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत पसरलेला आहे. तोच महाराष्ट्रातील २६ जानेवारी १९९८ रोजी मराठी कोकणवासीय खेडेगावतल्या जनतेची शहराशी नाळ जोडावी यासाठी प्राध्यापक मधू दंडवते साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील राजधानी मुंबई ते सावंतवाडी रोड यादरम्यान वा पार कर्नाटक पर्यंत सुखकर आणि सुरक्षित कमी खर्चिक वेळ असा कोकण रेल्वे मार्ग प्रवास सुरू केला.
त्याच कोकणातल्या मातीतल्या कोकणवासियांनी आपला खेडेगाव जपत; कोकणाई जगत, आपल्या सहबंधूंना एकत्र करीत कोकणवासी यांच्या समस्या आणि अडीअडचणी, सूचना यावर कार्य करण्यासाठी कोकणवासी यांचा आवाज शहरी करणापर्यंत पोहोचेल याकरीता प्रवासी बंधूंची सन २००९ साली कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे संघटना अस्तित्वात नव्हे प्रत्यक्षात आणून मोठ्या प्रमाणात कार्यशील राहात आहे. या संघटनेने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ७६ वे अमृत महोत्सव साजरा करीत सालाबाद प्रमाणे १५ ऑगस्ट २०२३ चा स्वातंत्र्य दिन सोहळा रांगोळी प्रदर्शित करीत ठाणे स्थानकात मधल्या महत्त्वाच्या प्रवासी पुलावर भव्यदिव्य सुटसुटीत रांगोळी काढीत भारतीय स्वतंत्र दिनाचा ७६ वा अमृत महोत्सवाचा प्रदर्शनीय सोहळा छोटे खानी साजरा केला. या संघटनेस ठाणे स्थानकातील स्थानक निर्देशक श्री अरुण प्रताप सिंह, स्थानक मुख्यप्रबंधक श्री तावडे साहेब, स्थानक उपप्रबंधक, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व कर्मचारी वर्ग, मुख्य तिकीट तपासनीस आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यावेळी तसेच खालील आवर्जून उपस्थिती असलेले संघटनेचे सभासद आणि कार्यकारी पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
संघटनेचे सदस्य
श्री राजू कांबळे (प्रमुख सल्लागार) यांच्या अधिपत्याखाली श्री. दर्शन कासले (सचिव), श्री. सुजित लोंढे (अध्यक्ष) श्री. संभाजी ताम्हणकर (खजिनदार), श्री. संतोष पवार,/श्री संतोष निकम (मा. अध्यक्ष/मा. उपाध्यक्ष) श्री. यशवंत बावदाणे (सल्लागार), श्री. तुषार साळवी (सल्लागार), श्री. महेश धाडवे (सल्लागार), श्री. विजय जगताप (सल्लागार), श्री. सुहास तोडणकर (संपर्क प्रमुख), श्री. विकास कांबळे, श्री.राजू कदम, श्री. प्रमोद घाग, श्री. नामदेव चव्हाण, श्री. गोविंद आमडोसकर, श्री. अमित चव्हाण, श्री. अनंत लोके, श्री. नागेश गुरव, श्री.गोपीचंद गुरव, श्री. विजय चव्हाण, श्री. सुजित नार्वेकर, श्री. रूपेश शिंदे, श्री. शरद धाडवे, श्री. साहील सकपाळ, श्री. वेदांत सावंत, श्री परेश गुरव, श्री. जितेंद्र बाईत (सर्व सभासद) आदि, त्याचबरोबर रांगोळी कला रेखाटक श्री. विलास सावंत आणि दिलीप सावंत यांचे अनमोल सहकार्य मिळाले.