(देवरूख / सुरेश सप्रे)
शिपोशी गावाचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योजक दिलिप बाईंग याचे रविवारी पहाटे हदयविकाराने प्रभादेवी येथील निवासस्थानी झोपेतच निधन झाले.
दिलिप बाईंग यांनी राजापूर लांजा. संगमेश्वर या तालुक्यात सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबवीत अनेकांना रोजगार उभे करणेस मदत केली. ते जिल्हासह मुंबईतील विविध संस्थेमधे कार्यरत होते. सर्व पक्षात त्याचे राजकीय संबंध होते. कोकणात कबड्डीसह क्रीकेटही रूजावे म्हणून त्यांनी कायम प्रयत्न केले. ते सहजीवन ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून शैक्षणिक साहीत्य व संगणक वाटपासह विविध उपक्रम राबवीत असत. ते शिपोशीतील शिक्षण प्रसारक संस्थेचे काही काळ अध्यक्ष होते.
न्या. कै. वैजनाथ आठल्ये महाविद्यालयात अनेक कोर्सेस सुरू करणेत त्यांची महत्वाची भुमिका होती. कोकणातील शिपोशी सारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात जर्मन, फेंच भाषा शिक्षण सुरू केले होते. देवरूख शिक्षण प्रसारक संस्थेतच्या वाटचालीत कै अरूण आठल्ये यांचे समवेत काम करत त्यांनी मोठे योगदान दिले.
कोकणचे नेते माजी आमदार कै.भाऊसाहेब व कै. ताराबाई वर्तक यांचे ते जावई होत. काही काळ ते भारतीय काँग्रेसमधे सक्रीय होते १९९० च्या दशकात जिल्हात काँग्रेसच्या वाढीसाठी प्रयत्न करताना गाव तेथे बुथ ही संकल्पना राबवत वाडीवस्तीवर काँग्रेसचे विचार पोहचविणेस मदत केली होती. सतत हसमुख असणारे सामान्यांच्या उद्धारासाठी झटणारे सर्वांचे आवडते दिलीप शेठ बाईंग यांचे रविवारी दुःखद निधन झाल्याने जिल्हासह कोकणावर शोककळा. पसरली आहे. त्यांचेवर दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.