केरळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्यात तनूर गावात पर्यटकांची होडी उलटून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. बोटीमध्ये जवळपास 40 हून अधिक पर्यटक असल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तानुर परिसरातएक हाउसबोट रविवारी सायंकाळच्या सुमारास बुडाली. यामध्ये लहान मुलांसह 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही दुर्घटना ओट्टुम्पुरम जवळ घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोटीमध्ये 40 पेक्षा अधिक लोक होते. १० पर्यटकांना जवळच्या खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांची आतापर्यंत संख्या 21 वर असल्याची माहिती केरळाचे राज्यमंत्री वी. आब्दुराहमान यांनी दिली आहे.
Malappuram, Kerala | Six people died after a tourist boat capsized near Tanur in Malappuram district of Kerala. Rescue operations are underway. pic.twitter.com/gPi0u2HuIi
— ANI (@ANI) May 7, 2023
या अपघाताचे कारण अजून समजले नाही. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बोट दुर्घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. मोदींनी मृतांप्रति शोक व्यक्त केला असून या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, अशी घोषणा केली आहे.