पतसंस्थेच्या ठेव वृध्दी मासात २ कोटी ठेवी संकलीत करण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला असून १ वर्षांसाठी ८ टक्के व्याजदर आणि ३ वर्षांसाठी ७.२५ टक्के (मासिक व त्रैमासिक व्याज) तसेच ३ वर्षांसाठी ७ टक्के (पुर्नगुंतवणूक) व्याजदर ठेवीदारांना मिळणार आहे. संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या ठेववृद्धी मासात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून संस्थेकडे २५ कोटीच्या ठेवी आजपर्यंत जमा झाल्या आहेत. गतवर्षी कोविडचा कठीण काळ असताना सुद्धा वर्षभरात ४ कोटीच्या ठेवी जमा झाल्या. या ठेववृद्धी मासात सुद्धा २ कोटीचे उद्धिष्ट पूर्ण होईल असा विश्वास संचालकांना असून त्यादृष्टीने सर्व संचालक, कर्मचारी, पिग्मी एजंट नियोजन करीत आहेत.
सर्वत्र सोनेतारण कर्जाची वाढती मागणी लक्षात घेता गुंतवलेल्या ठेवीचे योग्य नियोजन संस्था स्तरावरून करण्यात येत आहे. नव्याने सुरु झालेल्या शृंगारतळी शाखेसह सर्व शाखांना सोनेतारण कर्जाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संस्थेत सोनेतारण कर्जासह जामीनतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे. संस्थेमध्ये रोज ५ लाख पिग्मी जमा होत असून आरडी व बचतच्या माध्यमातून ठेवी जमा होत आहेत. संस्थेवरील विश्वास यामुळे अधिक दृढ होत आहे. संस्थेचे एकूण भागभांडवल ५७ लाख ७७ हजार, ठेवी २५ कोटी, कर्ज २० कोटी ९ लाख असून वसुली ९७ टक्के आहे. ग्राहकांनी ठेवी गुंतवण्यासाठी आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रा. नाना शिंदे व उपाध्यक्ष श्री. शेवडे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
पतसंस्था शाखांमध्ये विज बिलांची सुविधा
ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी पतसंस्थेने सर्व शाखांमध्ये विज बिल देयके स्विकारण्यास सुरवात केली आहे. बिले घेण्यासाठीचा कालावधीही दिवसभर ठेवण्यात आल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केल्याचे श्री. शेवडे यांनी सांगितले.