(चिपळूण)
श्री संत गोरा कुंभार युवा आघाडी चिपळूण व श्री संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुंभार समाज प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा १९ जानेवारीपासून थरार अनुभवायला मिळणार आहे. शरदचंद्रजी पवार कृषी महाविदयालय खरवते-दहिवली, चिपळूण येथील भव्य मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहेत. १९ ते २१ जानेवारी अशा ३ दिवस या स्पर्धा होणार आहेत.
चिपळूण तालुका कुंभार समाज संघटना सतत समाजाच्या विकासाच्या दृष्टिने व समाज संघटित राहावा या हेतूने अनेक चांगले उपक्रम राबवित असते. त्यातलाच एक सर्वांच्या आवडीचा विषय व ज्याची सर्वच समाज बांधव व क्रिकेटप्रेमी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात ती ‘श्री संत गोरा कुंभार प्रिमियर लीग (KPL), भव्य-दिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा’ सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 19, 20 व 21 जानेवारी रोजी, श्री संत गोरा कुंभार युवाआघाडी चिपळूण व श्री संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये संपूर्ण चिपळूण तालुक्यातील विविध गावातील कुंभार समाज बांधव एकत्रित खेळणार असून, एकूण 8 संघ लीग पद्धतीने खेळणार आहेत. ही स्पर्धा शरदचंद्रजी पवार कृषी महाविदयालय खरवते-दहिवली,ता.चिपळूण येथील भव्य मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
तरी सर्व कुंभार समाज बांधव तसेच इतर समाज बांधव, क्रिकेटप्रेमी या सर्वांनी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असं आवाहन श्री संत गोरा कुंभार युवा आघाडी चिपळूण व श्री संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण यांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच ज्या क्रिकेटप्रेमींना कोणत्याही कारणास्तव प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित रहाता येणार नाही, त्यांच्यासाठी या स्पर्धेचे YouTube Live Streaming करण्यात येणार आहे, अशी देखील माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.