(चिपळूण)
मौजे कुंभार्ली घाट येथे जखमी अवस्थेमध्ये सांबर जातीचे पिल्लू असल्याची माहिती घाटमाथा येथील पोलीस चौकीतील कर्मचारी श्री. इम्पाल यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. कळविलेल्या माहितीचे अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदर जखमी सांबर जातीच्या पिल्लांस वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यास घेवून सांबर जातीच्या पिल्लाची पाहणी केली असता त्याचा डाव्या पायाच्या मांडीवरती जखम दिसून आली. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. कानसे यांनी औषधोपचार करुन ती सुरक्षित असल्याची खात्रीकरून दि.२१ रोजी नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडून देण्यात आले.
मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.