(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव येथील बौद्धजन हितवर्धक संघ स्थानिक, मुंबई, विश्वस्त व महिला मंडळ यांच्यातर्फे बुद्धविहार जीर्णोद्वार उद्घाटन सोहळा १७ व १८ मे रोजी होणार आहे. या वेळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर, उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ कीर्तीकिरण पुजार आदी उपस्थित राहणार आहेत.
१७ ला सकाळी ९.३० वा. स्वागत, ९.४५ वा. राष्ट्रीय ध्वजारोहण, १० वा. पंचशील धम्मध्वजारोहण निळा ध्वजारोहण व समता सैनिक दल मानवंदना, १०.३० वा. कापडगांव बुद्धविहाराचे उद्घाटन, ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धपुतळ्याचे अनावरण, सायंकाळी ४ वा. बुद्ध प्रतिमेची मिरवणूक, रात्री ८ वा. मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. १८ ला सकाळी ११ वा. सत्कार समारंभ, सायं. ४ ते ७ फनीगेम्स, रात्री ९ वा. प्रबोधनात्मक बुद्ध-भीमगीत ऑर्केस्ट्रा होणार आहे.
दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक कापडगाव बौद्धजन हितवर्धक संघाने केले आहे.