(देवरुख)
एस टी महामंडळाच्या देवरुख आगारातील चालक अमित आपटे यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय कि, देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या गाड्या नादुरुस्त आहेत त्यामुळे प्रवाशांनी याचा प्रवास टाळा. गेल्या दोन तीन महिन्यात तक्रारी करूनही येथील आगार व्यवस्थापक प्रवाशांच्या जीवाशी खेळतोय असे या व्हिडीओत म्हटले आहे.
यामुळे प्रवाशांत घबराट पसरल्यावर एस टी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेत व्हिडीओत दावा केलेल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिले आहेत. शिवाय एस टी महामंडळाची बदनामी करीत प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या चालकाचे निलंबन देखील करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक बोरसे यांनी दिली आहे. या चालकाने कोरोना काळात देखील असे खोडसाळ व्हिडीओ केले होते असेही ते म्हणाले.