(रत्नागिरी)
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस पी हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी केले. दरम्यान महाविद्यालयातील आणि नवनिर्माण हाय सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बहारदार पोवाडा सादर केला.
जन्मोत्सवाच्या निमित्ताने कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक – सायली मालप तृतीय वर्ष वाणिज्य, द्वितीय क्रमांक – सेजल पंड्ये तृतीय वर्ष वाणिज्य, सिध्दी गावडे द्वितीय वर्ष कला तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक – पायल खापरे 11 वी वाणिज्य, द्वितीय क्रमांक – सृष्टी पाडावे 11 वी कला, आणि तृतीय क्रमांक – तन्वी आंबेकर 11 वी वाणिज्य यांनी पटकाविला या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमा प्रसंगी सृष्टी पाडावे, मृणाली तांबे, सानिया खतिब, अमृत गोरे, प्रसाद गायकवाड या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. सुकुमार शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि आजची परिस्थिती या बाबत मार्गदर्शन करताना स्त्रीयांवर होणारे अन्याय, अत्याचार, शेतकऱ्याची पिळवणूक, जाती धर्मातील तेढ यांवर भाष्य केले. या कार्यक्रमाला प्रा. प्रकाश पालांडे, प्रा. दिपाली तावड, सचिन टेकाळे, प्रा. डॉ. पूजा मोहिते, प्रा. ताराचंद ढोबाळे, प्रा. योगेश हळदवणेकर यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी तर आभार प्रा. सायली कांबळे यांनी मानले.