(प्रतिनिधी / रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे असलेल्या रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्याला खड्डे एवढे पडले होते की चालणे अशक्य झाले होते. गेले कित्येक वर्ष याकडे दुर्लक्षच झाले होते. रस्त्याच्या कामाचा उक्षी गावातील माजी उपसरपंच, समाजसेवक श्री हरिश्चंद्र बडंबे आणि त्यांचे सहकारी यांनी पाठपुरावा केला. त्यांनी नुकतीच अण्णा सामंत यांची भेट घेऊन रस्त्याची समस्या मांडली.
रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता गेले कित्येक वर्ष दुर्लक्षित असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. या कामा बाबतची समस्या मांडल्यानंतर रस्त्यावरील तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्यासाठी अण्णा सामंत यांनी एक जीसीबी, आणि डांबर मिश्रित खडी देऊन या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू करण्यात आले आहे. दिवाळीनंतर हा रस्ता परिपूर्ण करू अशी येथील ग्रामस्थांना अण्णा सामंत यांनी ग्वाही दिलेली आहे.