(रत्नागिरी)
सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने कुडामळमध्ये आयोजित इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन रविवारी (ता. १२) उत्साहात संपन्न झाली. यामध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या (आरसीसी) २५ जणांनी सहभाग घेत ५० व १०० किलोमीटरची राईड केली. याबद्दल क्लबच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. या सायक्लोथॉनमध्ये बाहेरून जिल्ह्यातून आलेल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक सायकलस्वार सहभागी झाले होते.
रत्नागिरीतून शनिवारी सायंकाळी सायकलस्वार ट्रॅव्हलर गाडीतून कुडाळला रवाना झाले. तिथे सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनने जेवण, राहण्याची चांगली व्यवस्था केली. रविवारी पहाटे राईडला प्रारंभ झाला. ५० किमीसाठी कुडाळ, एमआयडीसी ते वेंगुर्ले व परत तर १०० किमीसाठी मॅरेथॉन कुडाळ एमआयडीसी ते वेंगुर्ले बंदर तेथून केळुस, म्हापण, चिपी विमानतळमार्गे मालवण, चौके, धामापूर, काळसे, नेरुरपार, कुडाळ असा मार्ग होता. तीन-साडेतीन तासांत ५० किमी व ४.४५ ते ६.३० तासांत १०० किमी अंतर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सायकलस्वारांनी कापले. चढाव-उतार, वळणांचे रस्ते, कातळ सड्यावरील रस्ते आणि कुडाळमधील पर्यटनस्थळांना भेटी देत सायकलिंगचा आनंद लुटत अंतर पार केले.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सहभागी सायकलस्वार
५० किमी- मृणाल वाडेकर, मुग्धा सामंत, योगेश सामंत, साहिल पावसकर, शुभम शिवलकर, राकेश होरंबे, संदीप पावसकर, सुहास ठाकूरदेसाई. १०० किमी- धिरज पाटकर, महेश सावंत, दर्शन जाधव, नीलेश शहा, श्रद्धा रहाटे, आरती दामले, लाल्या खातू, एसआर डॉ. नितिन सनगर, एसआर यतीन धुरत, समीर धाटकर, विनायक पावसकर, गजानन भातडे, अमित पोटफोडे, प्रसाद देवस्थळी, योगेश मोरे.