(मुंबई)
राज्यातील नवीन सरकार आले आहे. अजून मंत्रिमंडाळाचा विस्तार झालेला नाही, मात्र काल मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांनी राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सामान्यांना दिलासा देणार निर्णय म्हणजे पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं टिका केली आहे. पेट्रोल-डिझेलवरील दर कपात केली. मात्र हे शिंदे सरकार येताच केंद्र सरकारने सामान्य माणूस आणि गृहिणींच्या किचनवर आर्थिक बोजा जीवनावश्यक वस्तूंवर लादले, जीएसटीच्या रुपाने तो टाकला आहे. एकीकडे जनतेला दिलासा देत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे त्या अगोदर स्वतःच्या तिजोऱ्या भरुन घेण्याचे काम भाजपने केले आहे, असा थेट आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या टिकेला शिंदे फडणवीस यांच्याकडून काय उत्तर येते हे पाहावे लागेल.