(दापोली)
कोविड काळापासून कार्यरत असणाऱ्या आरोग्य विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण न करताच कामावरून कमी करण्यात येत असल्याने बेमुदत काम बंद आंदोलन महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेने पुकारला आहे. यामुळे आरोग्य विभागातील डाटा संकलन प्रक्रिया थांबली आहे.
या काम बंद आंदोलनात दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य कें द्रातील ८ तर कार्यालयातील १ असे एकूण ९ डाटा एन्ट्री ऑपरेटर सहभागी झाले आहेत. कोविडमध्ये लसीकरण, कोविड चेकअपची नोंद आदी कामांमध्ये हे डाटा ऑपरेटर काम करत होते. परंतु प्रशिक्षण कालावधी पूर्ण न करताच कामावरून कमी करण्यात येत असल्याने हा संप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाकडून जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत डाटा एन्ट्री बंद राहण्याची शक्यता आरोग्य विभागामधून वर्तवण्यात येत आहे