(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त कोंड असुर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल कृष्णा विश्राम डावल गुरुजी यांचा आमदार शेखर निकम यांनी सन्मान केला.
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कृष्णा विश्राम डावल गुरुजी यांची उपसरपंच पदी निवड झाली. डावल गुरुजी यांनी ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित ग्रामस्थांसमवेत रविवारी आमदार शेखर निकम यांची सावर्डे येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. उपसरपंच निवडीबद्दल आमदार निकम यांनी अभिनंदन करून डावल गुरुजी यांना शुभेच्छा दिल्या.
पुढील कालखंडामध्ये काम करत असताना कोंड असुर्डे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सदानंद करदोडे व श्रीराम शिंदे ग्रामसेवक श्री अर्जुन जाधव व त्यांच्या टीमने आदर्शवत कामकाज करून विविध पुरस्कार प्राप्त केले. तालुका नव्हे तर जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून कोंड असुर्डेकडे बघितले जाते. तसेच आपल्याकडून देखील ग्रामपंचायतीचे उत्तम व चांगल्या प्रकारचे विकासात्मक काम करून राज्यस्तरावरील विविध पुरस्कार पुढील कालखंडात प्राप्त व्हावेत, असा आशावाद व्यक्त केला. मतदार संघातील कोंड असुर्डे ग्रामपंचायतीचे कार्य अजून आदर्शवत होण्यासाठी आपल्याला वेळोवेळी माझ्याकडून लागेल ते सहकार्य मिळेल असे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिले.
यावेळी कोंड असुर्डे ग्रामपंचायतीचे नवनियुक्त उपसरपंच श्री डावल गुरुजी, ग्रा. प सदस्य श्री श्रीधर रजपुत, ग्रा. प सदस्य श्री भारतराज गमरे, ग्रा. प सदस्यां सौ.अंकिता शिंदे, ग्रा. प सदस्यां सौ दीप्ती पानगले, सौ सोनल शिंदे, माजी सरपंच सदानंद करदोडे, माजी सरपंच संदेश कापडी, माजी सरपंच श्रीराम शिंदे, माजी उपसरपंच राजेश (राजू ) शिंदे, श्री धर्मेंद्र करदोडे, विनायक पवार, तुषार बिजितकर, स्वीय सहाय्यक श्री संजय कदम, स्वीय सहाय्यक राजेंद्र कदम उपस्थित होते.