काही व्यक्तींचा जन्म दिव्य विचारसरणीच्या अनुपालनासाठीच होतो. याची प्रचिती व्यक्तीच्या उमेदीच्या काळात येण्यास सुरूवात होते आणि पुढे ती व्यक्तीच अनेकांसाठी आदर्श वस्तुपाठ म्हणुन प्रस्थापित होते. स्वातंत्र्योत्तर काळात सन १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली. एक उदात्त अंत्योदयाचा हेतू साध्य करणे व भारतीय लोकशाहीचे स्वरूप व्यापक आणि विश्ववंदनीय बनवून देशाला समृद्ध करण्यासाठी जनसंघ सज्ज झाला. हेच वर्ष होते आदरणीय मुकुंद काकांच्या जन्माचे.
दि. ५ जानेवारी १९५१ या दिवशी जनसंघाचा आजीवन ध्वजवाहक नरहर जोशी यांच्या घरी जन्मला. बाळाचे नामकरण मुकुंद असे झाले. बालवयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशावर अनन्यसाधारण प्रीत जडली. आणि त्यानंतर मुकुंदाने समाजातील दिनदलित उपेक्षितांचे आयुष्य आनंददायी करण्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करण्याचा निर्धार केला. आणि आज वयाची ७१ वर्षे पूर्ण होत असताना अजूनही त्याचे पालन कसोशीने करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील आणीबाणीचे चटके त्यांनी सोसले आहेत. २५ जून १९७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या काळात त्यांनी कठोर तुरुंगवास भोगला. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व तावूनसुलाखून निघाले. तत्त्वांवर असणारी निष्ठा आजच्या तरुण पिढीने कोणाकडून शिकावी तर जवळचे उदाहरण म्हणुन अनेकजण मुकुंदरावांचे नाव घेतील.
राजकारण, समाजकारण करताना प्रसंगी स्वतःचे धन खर्ची घातले. हॉटेल व्यावसायिक म्हणून अत्यंत सचोटीने त्यांनी स्वतःचे घर चालवून मुकुंदराव पक्षाचे काम करू लागले. जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा स्थित्यंतराचा कालावधी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. एक काळ असा होता ज्यावेळी संसदेत पक्षाचे केवळ २ खासदार होते. आणि आज तोच पक्ष ३०५ खासदारांसहित जगातील सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. यात त्यांचा खारीचा वाटा नक्कीच आहे.
व्रतस्थ मुकुंदरावांना जनतेने कौल दिला आणि ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात अनेक लक्षवेधी कामे त्यांनी केली. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यात त्यांची सर्वदूर ओळख आहे.
निस्वार्थ सेवाभाव त्यांच्या आयुष्याचे सार आहे. संगमेश्वर तालुक्यात त्यांनी भारतीय जनता पार्टी रुजवली. अनेकांच्या सहाय्याने त्यांनी पक्ष टिकवला. पण अजूनही त्यांना आपले काम संपले नसल्याची जाणीव मनोमन आहे. भविष्यात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेत एक खासदार पाठवायचा आहे. लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी ते सर्व भाजपा कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असतात. त्यांचे मार्गदर्शन आम्हा कार्यकर्त्यांना असेच मिळत राहो यासाठी त्यांना उदंड निरामय आयुष्य लाभो अशा भारतीय जनता पार्टी संगमेश्वरच्यावतीने लक्ष लक्ष शुभेच्छा!
– सोशल मिडिया भाजपा, संगमेश्वर