(खेड/इकबाल जमादार)
खेड पोलीस ठाणे येथे दिनांक १६ जून रोजी १२.०० वा. ते १३.३० वा. यावेळेत श्री. शशिकीरण काशिद, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व श्रीमती निशा जाधव, पोलीस निरीक्षक खेड यांनी खेड पोलीस ठाणे शांतता कमिटी सदस्य यांची नुपुर शर्मा आणि माहीका कुमार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे अनुषंगाने मिटींग घेतली. सदर मिटींगमध्ये सर्व सदस्यांना शांतता राखण्याची तसेच सोशल मिडीयावरील पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर मिटींगमध्ये सर्व सदस्यांनी झालेल्या घटनेबाबत नुपुर शर्मा व माहीका कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला असून सदर घटनेबाबत खेड शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असे आश्वासन दिले. सदर मिटींग करीता शांतता कमेटीचे श्री. वैभव खेडेकर, श्री. सिंकदर जसनाईक, अनिकेत कानाडे, आरिफ मुल्लाजी, दिंगबर दळवी, जलाल कादीरी, प्रशांत खातु, वाहब साईन इत्यादी एकुण २० सदस्य उपस्थित होते.