(रत्नागिरी)
रत्नागिरी मध्ये प्रथमच भव्य दर्जेदार क्रीडा मैदानावर सावंत क्रिकेट अकॅडमी यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पार पडत आहेत. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून या चषकाला एससीजी(SCG) कप 2023 असे नाव देण्यात आले आहे. आणि ही परंपरा पुढे कायम ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून रत्नागिरीत क्रीडा विकास आणि उभारत्या खेळाडूंना चालना मिळावी आणि नवनवीन खेळाडू निर्माण व्हावे. सदर स्पर्धा ही सावंत ओएसीस स्पोर्ट्स अरीनाच्या मार्फत आणि सावंत क्रिकेट अकॅडमी च्या अंतर्गत पार पडत आहे.
रत्नागिरीतील कोळंबे गावी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट ग्राउंड वर नैसर्गिक टर्फ विकेट्स असलेल्या मैदानावर मुलांना ही खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शालेय स्तरामधूनच विद्यार्थ्यांचा विकास होत असतो आणि त्याचं प्रतिबिंब भविष्यात उमटत असतं. त्यामुळे या शाळांना उत्तेजित करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी ही टूर्नामेंट आयोजित करण्यात आली होती.
या टूर्नामेंटमध्ये रत्नागिरीतल्या तब्बल दहा नामांकित विद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, जी जी पी एस ,शिर्के प्रशाला,ए.डी .नाईक हायस्कूल, माध्यमिक विद्यामंदिर करबुडे, पटवर्धन हायस्कूल, सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट उद्यमनगर, सेंट थॉमस, नवनिर्माण या विद्यालयांचा यात समावेश होता.
या स्पर्धा होण्यामागे या शाळांमधील क्रीडा शिक्षकांचे महत्वाचे योगदान आहे. यात श्री मंदार सावंत, अजित चवेकर (फाटक हायस्कूल), श्री अजित दावडे (सेंट थॉमस ), श्री बाहुबली नाईक ( करबुडे विद्यामंदिर ), श्री श्रीपाद गुरव( पटवर्धन हायस्कूल), श्री प्रमोद कदम (जी जी पी एस), श्री कृष्णा गावडे( सिक्रेट हार्ट उद्यममगर कॉन्व्हेंट ), विनोद मयेकर( शिर्के प्रशाला), श्री .महिनूद्दीन भैरिवाडी (ए. डी .नाईक ), श्रीमती स्वप्नाली चव्हाण (नवनिर्माण) यांचा समावेश आहे. त्यांनी घेतलेल्या पुढाकारांमुळे व विद्यार्थी प्रेमामुळे ही स्पर्धा सुरळीत पार पडत आहे. तसेच हे सर्व एकत्रित जुळवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली ती म्हणजे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.विनोद शिंदे यांनी या टूर्नामेंट मध्ये प्रत्येक संघाला चार मॅचेस खेळायला मिळाल्या आहेत. ही स्पर्धा लाल लेदर बॉलवर खेळवण्यात आली. सदर स्पर्धा ही टी 20 स्वरूपाची होती व आंतरराष्ट्रीय टी 20 नियमानुसारच पार पडली.
यासाठी सावंत क्रिकेट अकॅडमी कडून निशुल्क प्रवेश आणि मोफत प्रवास ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, क्रीडा कौशल्य जागृत करण्यासाठी आणि स्वप्नवत असणाऱ्या मैदानांवरती खेळवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता, असे मत सावंत ओएसिस स्पोर्ट्स अरीना च्या व्यवस्थापकीय संचालक श्री केतन सावंत यांनी मांडले. आणि सावंत ओएसीस स्पोर्ट अरीनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुजम्मिल सावंत यांचे सहकार्य लाभले. हे सामने सुरळीत पार पडण्यासाठी तांत्रिक कौशल्यपूर्ण मार्गदर्शन केले ते अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्री लक्ष्मीकांत पांडे यांनी.
त्याचप्रमाणे स्कोरर आणि एम्पायरिंग ची जबाबदारी रत्नागिरीतील तरुण खेळाडू ओम नागवेकर, साहिल गोवळकर, अथर्व डोमणे, सार्थक नार्वेकर, श्याम शेंडे यांनी घेतली तर या टूर्नामेंट मध्ये श्री. वरद दामले यांनी समन्वयकाची भूमिका निभावली. तसेच ग्राउंड मॅन दिवाकर भातडे आणि सुंदर शर्मा यांनी ग्राउंड मेंटेनन्स उत्तम प्रकारे केला. तसेच खानपानाची व्यवस्था श्री.हेमंत फडके यांनी सांभाळली. तर इतर व्यवस्थापन वरद चुनेकर यांनी केले.
रत्नागिरी शहरात प्रथमच आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा एखाद्या उत्कृष्ट ग्राउंडवर खेळायला मिळाल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा विलक्षण आनंद पाहायला मिळाला. संपूर्ण चषकासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. किरण सामंत यांनी कोळंबे येथील ग्राउंड वर येऊन सदिच्छा भेट दिली. त्यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये योगदान मोलाचे आहे. या माध्यमातून मुंबई पुण्यासारख्या सुविधा रत्नागिरीत आता निर्माण होत आहेत, हे रत्नागिरीकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. यामुळे अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे आणि स्वतः ला सिद्ध करण्यासाठी मुंबई पुण्यात घर सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा एक नवा आशेचा किरण असणार आहे.