(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील कोकणची काशि ओळखले जाणारे आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर मंदिराच्या भव्य वास्तूचा कलशारोहण व उद्घाटन सोहळा दि. १३ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्ताने १२ ते १४ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.१२ जानेवारीला सकाळी ७. २० वा. ध्वजारोहण, ८ वा. वास्तूशांती, दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी १.३० ते ३ वा. महाप्रसाद, ३.३० ते सायंकाळी ६ या वेळेत सोमेश्वर मंदिर ते मार्लेश्वर मंदिर या मार्गावर देवदेवतांची सवाद्य भव्य मिरवणूक, सायंकाळी ६.३० वा दीपोत्सव, ७ ते रात्री १० पर्यंत कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा करमणूकीचा कार्यक्रम तर ९.३० ते १०.३० पर्यंत महाप्रसाद.
दि. १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. अल्पोपहार, ८.१० वा. प्राणप्रतिष्ठा आणि वरद शंकराची पूजा, दुपारी १२.२० वा. कलशारोहण सोहळा, दु. १.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत कल्याणपूर्व हळदी समारंभ, सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत उद्घाटन, स्मरणिका अनावरण व स्वागत समारंभ, रात्री ९.३० ते १०.३० पर्यंत महाप्रसाद. दि. १४ जानेवारी रोजी श्री मार्लेश्वर कल्याण विधीशी निगडित दिंड्या पालख्यांचे आगमन आणि कल्याणपूर्व विधी, रात्री ९ ते १०.३० पर्यंत महाप्रसाद, रात्री १२ वा. श्री मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रयाण होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे व भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँन्ड चॅरीटेबल ट्रस्ट आंगवलीतर्फे करण्यात आले आहे.