(मालवण)
प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आणि नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. सिंधुदुर्ग मालवण येथील दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार शनिवार ०२ मार्च २०२४ हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे ५ ते ७ लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार शनिवार ०२ मार्च २०२४ हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे. दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते.
आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या जत्रेत दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते. रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते.