कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव व्हावा, यासाठी क्रॉस व्हेंटिलेशनवर भर दिला जात आहे. शक्य असेल तेव्हा इनडोअर जागांमध्ये व्हेंटिलेशन वाढवा. घरात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील याच गोष्टींवर भर दिला आहे. ते म्हणाले की बंद जागांमध्ये हवा खेळती राहणं आवश्यक आहे. एका नव्या संशोधनानुसार कोरोना संक्रमणासाठी पूरक ठरणारा कोरोनाचा नवा विषाणू SARS-COV-2 हा हवेमार्फत पसरतो आहे,यास दुजोरा मिळाला आहे. एअरोसोल इन्फेक्शन म्हणजे हवेतील असे कण की जे रोगांच्या किटाणू किंवा विषाणूंनी तयार झाले आहेत. अशातच जर संक्रमित रुग्ण खोलीत शिंकला किंवा खोकला तर तो खोलीतून बाहेर पडल्यानंतरही अनेक तास विषाणू त्या खोलीतच असतो. त्यामुळे अशा खोल्यांमध्ये पुरेसे व्हेंटिलेशन असणं गरजेचे आहे.