(नवी दिल्ली)
अल्ट न्यूज वृत्तसंस्थेचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली कोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. ट्विटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. २५ नोहेंबर २०२१ रोजी एका खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार आशिष कटियार यांनी झुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
झुबेर यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३ ए (दोन गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर ११ जुलै रोजी त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.