सकाळी तुम्ही बाहेर पडलात आणि समोर मोठा अजगर आला तर? या घटनेची कल्पना करणेही सोपे नाही. पण असाच काहीसा प्रकार टिटवाळ्यात घडला आहे. रिक्षात प्रवाशांऐवजी मोठा अजगर येऊन बसल्याची घटना घडली आहे. ही घटना टिटवाळा शहरातील असून, अजगर पाहून रिक्षाचालक व प्रवाशांची पळापळ झाल्याची घटना समोर आली आहे.
या अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने व वनपाल रामदास घोरले यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गाच्या सान्निध्यात अजगर सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. अजगराच्या बचावावेळी वॉर फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे, प्राणीमित्र प्रेम आहेर, रेहान मोतीवाला, रोमा त्रिपाठी तसेच वनविभागाचे कर्मचारी जयेश घुगे, वनरक्षक दळवी आदी उपस्थित होते.