(ज्ञान भांडार)
भारतातील काही गावे त्यांच्या विशेष वेगळेपणाकरीता ओळखली जातात. भारतातल्या ६ लाख ५० हजार गावांपैकी किमान १६ गावे अशी आहेत, जी आज जगात त्यांच्या वेगळेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. या गावांमध्ये काही खास गोष्टी आहेत, ज्यामुळे जगात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
- आळंदी गाव :
आळंदी या गावात आजही (गाव वेशीत) मास – मटण मिळत नाही, या गोष्टीला 700 वर्षे पूर्ण झालीत. - शनि शिंगणापूर (महाराष्ट्र) :
संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही. अहमदनगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात हे गाव आहे. गांवात पोलीस चौकी, पोलीस ठाणे नाही. गांवात चो-या होत नाहीत. या गावात शनिदेव दर्शनासाठी दररोज चाळीस हजारच्या आसपास भाविक येतात. गावातील शनिदेवांच्या मंदिरामुळे आजपर्यंत लोक श्रद्धा भक्तीने व गुण्या-गोविंदाने व शांत झोप घेतात. या गावाला अद्याप कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले नाही. - शेटफळ (महाराष्ट्र) :
प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती या गावात आहे. पुण्यापासून 200 की.मी. सोलापूर जिल्ह्यात हे गाव आहे. गावात जवळ जवळ 2600 खेडूत असे आहेत की, त्यांना सर्पदंशामुळे फरक पडत नाही किंवा सर्प त्यांना दंशच करीत नाही. - हिवरे बाजार (महाराष्ट्र) :
भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे. ६० च्या वर अब्जाधीश घरे येथे आहेत. एकही “गरीब” नाही. सर्वाधिक GDP असणारं खेडं. अहमदनगर जिल्ह्यातील हे एक गाव आहे. इ.स. १९९० साली या गावाची परिस्थिती एवढी भयानक होती की, बऱ्याच नागरिकांना दोन वेळेस जेवणाचा प्रश्न भेडसावत असे. आज भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे आहे. या गावात आज मितीला एकही कुटुंब दारिद्रय रेषेखाली नाही. भारतातील दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारं गाव म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. या गावातील सरासरी मासिक उत्पन्न हे १९९५ साली रु. ३०००/- आज रु. ३०,०००/- पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. - पनसरी (गुजरात) :
भारतातील सर्वात “अत्याधुनिक” खेडेगांव. गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून, Wi-Fi सुविधाही आहेत. गावातील सर्व ‘पथदीप’ सौरउर्जेवर चालतात. गुजरात मधील ६००० लोकसंख्या असलेलं साबरकंठा जिल्ह्यातील हे एक गाव आहे. या गावात दोन आधुनिक सुसज्ज प्राथमिक शाळा आणि एक सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सार्वजनिक उद्घोषणा करिता सर्व गावात आवाज जाईल असे १४० भोंगे ( लाऊड स्पीकर ) ठीकठिकाणी लावण्यात आले आहे. - जंबुर (गुजरात) :
भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक “आफ्रिकन” वाटतात(परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख) जुनागढ जिल्ह्यातील गिर अभयारण्याच्या सानिध्यात हे गाव आहे. भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक “आफ्रिकन” वाटतात. येथील नागरिकांना तुम्ही आफ्रिकन सोवेटो ( Soweto) किंवा मोम्बासा ( Mombasa) असे समजुन फसगत होऊ शकते. या परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख या गावाची झाली आहे. यांच्याबद्दल एक इतिहास सांगितला जातो की “जुनागढच्या नवाबाने” इस्लाम धर्मीयांचा प्रसार व्हावा म्हणून यांना आफ्रिकेतुन स्थलांतरीत करून आणले. परंतु काळाच्या ओघात त्यांनी स्थानिक भाषा आणि धर्म याचा स्वीकार केला. - कुलधारा (राजस्थान) :
“अनिवासी” असलेले गांव. गांवात कोणीही रहात नाही. येथील घरे बेवारस सोडलेली आहेत. - कोडिन्ही (केरळ) :
जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं. केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील हे एक दुर्गम खेडेगाव आहे. जैविक संशोधनाकरिता हे एक चांगले गाव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या गावात भारतातील जास्तीत जास्त जुळ्या मुलांचा जन्म या गावात झाला आहे, ही एक आश्चर्य चकित करणारी बाब आहे. या गावाची लोकसंख्या जवळ जवळ २००० च्या आसपास असुन, त्यापैकी ४०० कुटुंबात जुळे मुले जन्माला आली आहेत. या गावाबद्दल सांगायचे तर १००० मध्ये ४५ कुटंबात जुळे मुले आहेत. - मत्तूर (कर्नाटक) :
दैनंदिन व्यवहारासह सगळ्या कामकाजासाठी “संस्कृत” भाषेचा वापर करणारे 10,000 वस्तीचे गांव. - बरवानकाला (बिहार) :
ब्रम्हचाऱ्यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून गांवात लग्न सोहळाच नाही. हे आहे सिंगल लोकांच गाव. या गावात गेल्या ५० वर्षांमध्ये एकही लग्न झालेलं नाही. या गावात पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने या गावात कोणीही आपली मुलगी देत नाही. या गावात १६ ते ८० वर्षांपर्यंतचे ‘सिंगल’ लोक राहतात. - मॉवलिनॉन्ग (मेघालया) :
‘आशिया’खंडातील सर्वात “स्वच्छ” गांव. पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग शिल्प. मेघालय मधल्या मॉवलिनॉन्ग गाव हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखलं जातं. स्वच्छ भारत अभियान सुरु होण्याआधीच हे गाव स्वच्छतेच्या दिशेने अग्रेसर झाले होते. स्वच्छतेबरोबर या गावात साक्षरतेचं प्रमाण १००% आहे. - रोंगडोई (आसाम) :
बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो, अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव. असं लग्न हा येथील ‘ग्रामसण’च असतो. - कोर्ले,रायगड जिल्हा (महाराष्ट्र) :
रायगड जिल्ह्यातील कोर्ले हे गाव स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही “पोर्तुगीज” भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव. - मधोपत्ती गाव (उत्तर प्रदेश) :
एका गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव, ९० % पेक्षा जास्त सरकारी नोकरी मध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे. - झुंझनु (राजस्थान) :
फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती. ६ हजार पेक्षा जास्त सेवा निवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू - मायोंग (आसाम) :
या गावाची ओळख ‘जादूटोणा करणाऱ्यांचं गाव’ अशी आहे. आजच्या आधुनिक जगात जादूटोणा मानला जात नसला तरी या गावातील लोक जादूटोणा आणि तंत्रविद्येवर भालेतच विश्वास ठेवून आहेत. गावकऱ्यांना वाटतं की तंत्रमंत्राने कोणतीही इच्छा पूर्ण करता येते. या गावात काळ्या जादूचे प्रयोग केले जातात. भारतातील हे एक सर्वात मोठं जादूटोणा करणाऱ्यांचं व शिकणाऱ्यांचं गाव आहे.