( रत्नागिरी / प्रतिनिधी )
आझादी का अमृत महोत्सव ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रम तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. 1 मध्ये उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ नाखरे प्रशालेत 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात आला होता. निर्मल ग्रामपंचायत नाखरे येथील बक्षीस वितरण समारंभाने त्याची नुकतीच सांगता करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक शरद जोशी, सरपंच शुभदा नार्वेकर, उपसरपंच विजय चव्हाण, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मोहन जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते निर्मल ग्रामपंचायत नाखरे आयोजित स्पर्धेतील आदर्श शाळा नाखरे नं 1 मधील प्रमुख विजेत्यांचा गौरव सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.
गीतगायन स्पर्धा : – क्रांतीग्रुप ( प्रथम क्रमांक ) क्रांतीकारक ग्रुप नरवणेवाडी, तिरंगा ग्रुप ( तृतीय क्रमांक )
रांगोळी स्पर्धा : श्रावणी धर्मेंद्र कुळये (द्वितीय क्रमांक )
ढोलकी वादन :– अंश राजन जाधव, गणेश राजेंद्र कुळये
शाळास्तरावरील विविध स्पर्धा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुढीलप्रमाणे –
▪️ चित्रकला स्पर्धा : – आराध्य सुदर्शन धुळप, पायल जितेंद्र जाधव, स्वरा नारायण बेंद्रे ( मोठा गट ) अनन्या सुधीर धुळप, स्वराज सुहास घवाळी, अर्णव अजय साळवी ( लहान गट )
▪️ निबंध स्पर्धा : समिक्षा सचिन गुरव, श्रावणी धर्मेंद्र कुळये, रिद्धी राकेश गुरव ( मोठा गट ), सार्थक वैभव गुरव, संस्कृती प्रसाद पावसकर, स्वरा स्वप्नील गमरे ( लहान गट )
▪️ घोषवाक्य स्पर्धा : – समिक्षा सचिन गुरव, स्वराज सुहास घवाळी, आयुष अंकुश घवाळी
▪️ वक्तृत्व स्पर्धा : रिद्धी राकेश गुरव, श्रावणी धर्मेंद्र कुळये ( मोठा गट ), दुर्वा सुधीर धुळप, शमिका नवनाथ घवाळी ( लहान गट ),
▪️ गीतगायन स्पर्धा : क्रांतिकारक ग्रुप, तिरंगा ग्रुप, महोत्सव ग्रुप ( मोठा गट ), क्रांती ग्रुप, अशोक ग्रुप, सम्राट ग्रुप ( लहान गट )
▪️ रांगोळी स्पर्धा : श्रावणी धर्मेंद्र कुळये, समृद्ध भागवत जाधव, सानवी पांडुरंग नरवणे ( मोठा गट ) देवयानी मंगेश मोगरकर, अश्विनी राजेंद्र हरमले, सोहम संतोष गुरव
▪️ वेशभूषा स्पर्धा : पायल जाधव, जान्हवी विनोद जाधव, शमिका संदीप जोशी
दरम्यान निर्मल ग्रामपंचायत नाखरे आयोजित मुलींच्या हिमोग्लोबिन तपासणीत 20 विदयार्थीनी तर गीतगायन, रांगोळी स्पर्धेत 47 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याने स्पर्धाप्रमुख पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर, मुख्याध्यापक शशिकांत घाणेकर यांची प्रेरणा मुलांना प्रगतीपथावर नेण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडीताई मंगला चव्हाण, संजीवनी जाधव, पोषण आहार स्वयंपाकी पूजा धुळप, मदतनीस धुळप, स्वयंसेवक श्रुतिका महाडिक, आदिश्री धुळप, व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, निर्मल ग्रामपंचायत नाखरे यांचे विशेष सहकार्य लाभले. हर घर तिरंगा उपक्रमात शिक्षक संख्या कमी असतानाही सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल पावस गोळप उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश काजवे, विस्तार अधिकारी सशाली मोहिते, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.