(संगमेश्वर)
न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयात ‘हर घर तिरंगा’ व ‘स्वराज्य महोत्सवानिमित्त’ 11आॕगस्ट 22 रोजी तिसऱ्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आहे होते.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात-अज्ञात नायक व विविध घटना यांचे स्मरण व्हावे म्हणून विद्यालयाने जनजागृतीपर अनेक उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे यासाठी निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
दि.11आॕगस्ट रोजीच्या प्रभातफेरीत बॕडपथकाच्या नेतृत्वाखाली इ.5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनात सहभागी होऊन दांडी येथे यात्रा काढून मिठाचा कायदा मोडला होता. गांधीजीची व सोबतीच्या लोकांची वेशभूषा करुन विद्यार्थ्यानी दांडी यात्रेचे जिवंत दृश्य साकार केले होते.
तसेच विद्यालयातील महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी ‘आझाद हिंद सेनेच्या वेशात शिस्तबद्ध संचलन केले. त्याचबरोबर भारत एक विविधतासंपन्न देश आहे. भारतातील प्रत्येक प्रांतात वेगवेगळी वेशभूषा केली जाते. विद्यार्थ्यांनी अशा विविध प्रांताची वेशभूषा करून भारतातील विविधतेचे दर्शन घडविले.
दि.13 ते 15 आॕगस्ट 2022 या कालावधीत भारतातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने तीन वेळा प्रभातफेरी काढून देशभक्तीपर घोषणा, घोषवाक्यांचे फलक व तिरंगा ध्वज यांच्या माध्यमातून विद्यालयाने जनजागृती केली.
प्रभातफेरीच्या माध्यमातून विविध ऐतिहासिक दृश्य जिवंत केल्याबद्दल ग्रामस्थांकडून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतूक होत होते. सदर प्रभातफेरीचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. मणेर सर व पर्यवेक्षिका सौ. मणेर मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले.या नेत्रदिपक प्रभातफेरीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.