(चिपळूण/प्रतिनिधी)
वेगवेगळ्या कुल्प्या वापरुन सध्या चोरीचा फंडा सुरु आहे. ऑनलाईनच्या नावाखाली सर्वसामान्यांना फसवण्याचा एका नवा प्रकार समोर आला आहे. ‘आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आपला वीज पुरवठा आज रात्री 9.30 वाजेपर्यंत खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असा बनावट मेसेज ग्राहकांना मोबाईलवर येत आहे. चिपळुणात असे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही मेसेज महावितरणकडून पाठवण्यात येत नाहीत, त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद देवू नये असे महावितरणने कळवले आहे.