(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ -जाकादेवी येथील सरोदे समाज विकास मंडळाचे माजी सल्लागार, तसेच जाकादेवी खालगाव परिसरातील उद्योगशील व्यक्तिमत्त्व मोहन दाजी शिवगण यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
कै.मोहन दाजी शिवगण अत्यंत कष्टाळू, जिद्दी आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व होते. प्रसंगात ते अनेकांना आधार देत असत. ते प्रचंड धाडसी, करारी आणि हौशी होते. उच्चशिक्षित व्यक्तींविषयी त्यांच्या मनात कमालीचा आदर होता.
सरोदे समाज विकास मंडळाच्या अनेक विविध कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे.गोंधळी कला कार्यक्रमात ते रंगून जात असत. मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वत्र परिचित होते.सार्वजनिक कामात ते नेहमीच अग्रेसर असत.
छोटया मोठया व्यावसाय- उद्योगातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपला संसार उभा केला.
१३ जुलै रोजी त्यांचे जाकादेवी येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.यांच्या अंत्ययात्रेत सर्वस्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,नात, भाऊ, भावजय,पुतणे,असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल परिसरात व सरोदे समाजातून दुःख व्यक्त होत आहे.