(खेड / इक्बाल जमादार)
माझ्याकडे निवेदन द्वारा संगलट गावचे युवा कार्यकर्ते साबीर कौचाली यांनी आपली समस्या मांडली आहे. त्यासाठी आपण लवकरच साबीर कौचाली यांना मुंबईत बोलवून घेऊन त्यांची समस्या तातडीने दूर करू, असा विश्वास महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री, बाळासाहेब साहेब ठाकरे पक्षाचे नेते रामदास भाई कदम यांनी व्यक्त केला.
साबीर कौचाली यांनी मांडलेल्या विकास कामाच्या प्रश्नामध्ये दापोली तालुक्यातील दाभोळ ते घोपावे व खेड तालुक्यातील बहिरवली गाव ते कंबोने गावातील पुल व मुुंबके ते निळीक अशी गावे असून गेल्या किती वर्षापासून पुलाचे काम रखडले आहे. सदर पुल झाला तर पर्यटकांसाठी व या पुलांच्या अलीकडे व पलिकडे दोन तालुक्यामध्ये या पुलामार्फत लोकांना तिथल्या तिथे जोडले जाईल. तसेच मुंबई पुणे व जगभरातून येणारे पर्यटक व इथल्या स्थानिक लोकांना गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी, गोवा पुढे कुठेही जाण्यासाठी पुढील मार्गास येण्या-जाण्यास फार योग्यशीर ठरेल. तसचे लोकांच्या प्रवासामधील अंतरामध्ये फार वेळ व कि.मी अंतर वाचेल.
सदर कामासाठी अनेक वर्षांपासून जनतेमार्फत मागण्या केल्या जातात. परंतु आपल्याकडे आशा बाळगून संपुर्ण खारी पट्टयाने या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तरी सदर आपण खेड देवणे पुलासारखे दाभोळ ते घोपावे, बहिरवली ते कंबोने मुंबके ते निळीक या पुलासाठी लक्ष देऊन मंजुरी मिळवून देणार आहे. लवकरात लवकर या पुलाचे काम होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे रामदासभाई कदम म्हटले.