(मकरंद सुर्वे / संगमेश्वर)
राज्यात अस्वच्छतेमुळे सध्या अनेक भागात रोगराई पसरलेली असताना डेंगू, मलेरिया, कोरोना सारख्या गंभीर रोगांनी लोकं जागृत झालेली आहेत. असे असताना मात्र संगमेश्वर स्टॅन्ड जवळील शौचालयाजवळ एवढी घाण आहे की, आसपास वावरणारे प्रवासी व जवळील दुकानातील व्यक्ती अक्षरश नाक तोंड दाबून राहत आहेत. अशा वेळी डेपोचे आगार व्यवस्थापक पात्रे यांचे दुर्लक्ष होत आहे, असे बोलले जात आहे. या बाबत लोकांनी आता कंटाळून अस्वच्छते विरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. येथील व्यापारी, शिक्षक व स्थानिक लोकांनीही याबाबत आवाज उठविण्याचा इशारा दिला आहे. मात्र तरीसुद्धा एसटी स्टँडचे पदाधिकारी व आगार व्यवस्थापक पात्रे डोळ्याला पट्टी लावलेलेचे दिसून येत आहेत.
सोबत संगमेश्वर डेपोतील छायाचित्रात घाणीचे साम्राज्य दिसत आहे. अस्वच्छतेच्या यासंदर्भात आरोग्य अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.