( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोंड असुर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते अशा वेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कृष्णा विश्राम डावल गुरुजी यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना नवनियुक्त उपसरपंच डावल गुरुजी यांनी सांगितले की, कोंड असुर्डे सार्वत्रिक निवडणूक ही गाव पॅनल म्हणून झाली. त्यानंतर सरपंच निवडी झाल्यानंतर विविध माध्यमातून पक्षीय रंग लागण्यात आला. त्यामुळे निश्चितच उपसरपंच निवडणूक चूरशीची होणार असे वाटत होते. लोकप्रिय आमदार महोदय, कुणबी समाजाचे पदाधिकारी, बौध्द वाडीचे प्रमुख मंडळी एकत्र येत उपसरपंचपदी माझी निवड व्हावी असे एकमताने ठरले त्या अनुषंगाने माझी आज बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली आहे. मला एवढी मोठी सामाजिक काम करण्याची संधी दिल्याबद्दल आमदार निकम साहेब यांचे, कुणबी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, बौध्दवाडीतील प्रमुख मंडळी, सर्व गावकर मंडळी ग्रा.प.चे सरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ्यांचे मनस्वी आभार मानतो. सर्वाना एकत्रित घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार करेन, ग्रामपंचायतीच्या विकासाचा चढता आलेख आहे तसाच तो पुढे देखील उंचावण्यासाठी एकजुटीने काम करेन असे असे नूतन उपसरपंच डावल गुरुजी यांनी सांगितले. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.