(कोल्हापूर / किशोर गावडे)
जय हनुमान घोडेगिरी तालीम मंडळ शिरोली पुलाची या मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शाहू सडोली संघाने अंत्यत चुरशीच्या लढतीत आपल्या सर्वांगसुंदर खेळाने विजेतेपद पटकावले.
जय हनुमान घोडेगिरी तालीम मंडळाच्या पटांगणावर संपन्न झालेल्या अंतिम सामन्यात शाहू सडोली संघाने ने नवभारत संघावर प्रतिकार करत 27-21 गुणांनी पराभव करून विजय मिळवला. व “घोडेगिरी चषक आपल्या नावे केला. मध्यांतराला शाहू सडोली ने 14-13 अशी एक गुणांची आघाडी घेतली होती. नवभारत संघाचा रोहित साठे व तुषार पाटीलने मध्यांतरानंतर आपला खेळ गतिमान करण्याचा प्रयत्न केला. विवेक भुयरे छान खेळला. शाहू सडोली संघाचा आकाश पाटील, सचिन पाटील,व योगेश पाटील यांच्या झंजावाती चढाया तानाजी पवारची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शाहू सडोली संघाला शक्य झाला.
नवभारतच्या खेळाडूंनी पूर्वार्धात छान खेळ केला. मात्र फक्त आठ गुणांची कमाई केली. नवभारत संघ उत्तरार्धात दुबळा पडला. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अखेर 27-21 गुणांनी नवभारत संघावर मात करून जेतेपदावर नाव कोरले. व 41हजार रुपायाचा मानकरी ठरला. तर नवभारत संघाला 21 हजार रुपयांचे इनाम पटकावले.
या स्पर्धेत शाहू सडोली संघाचा रोहित साठे सर्वोत्तम खेळाडू ठरला. फ्रीज देऊन सन्मानित केले गेले तर छावा शिरोळी संघाचा रोहित माने पक्कड, तर नवभारत संघाचा तानाजी पवार चढाईचे पारितोषिक पटकावले. पारितोषिक वितरण समारंभाला सागर पाटील (API) शिरोली पोलीस स्टेशन, सतीश पाटील, दिलीप शिरोळे, संपत संकपाळ, धीरज पाटील, विनायक कोळी, रावसाहेब मोंगल आदी उपस्थित होते.